Sharad Pawar : ‘याच्याशी कुणाचाही काही संबंध नाही. हा निर्णय त्यांचा (जरांगे पाटील) आहे. पूर्वीचाही निर्णय त्यांचा होता. त्यांच्या निर्णयाचा मला आनंद आहे. तो एवढ्यासाठी की, ते सतत सांगतात भाजपला आमचा विरोध आहे. या पध्दतीने उमेदवार ठेवले असते तर त्याचा लाभ भाजपला झाला असता. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय योग्य आहे.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या निवडणूक न लढण्याच्या निर्णयावर दिली आहे.
मनोज जरांगेंनी यांनी आज सकाळी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत आपला निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपला निर्णय देताना जरंगें पाटील म्हणाले, “आम्ही रात्री साडेतीनपर्यंत चर्चेला बसलो होतो. आम्ही या निवडणुकीत मित्रपक्षांसोबत दलित आणि मुस्लीम उमेदवार उभे करणार होतो. कारण, एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. आम्ही राजकारणात नवखे आहोत. उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय त्यांनी घेतला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांकडे अर्ज मागे घेण्यासाठी वेळ होता. अशातच आता राज्यातील राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.