Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील निवडणूका (Maharashtra Assembly Election 2024) आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच आता निडवणुकीची रंगत वाढत चालली आहे. राज्यात यंदा दोन मुख्य आघाड्यांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यात महायुती तसेच महाविकास आघडी यांच्यात ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, काल सोमवारी 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. अशा परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आता राज्यभरात किती उमेदवार मैदानात उतरलेले आहेत तर किती जणांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे याची आकडेवारी समोर आली आहे. काल काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर राज्यातील उमेदवारांची संख्या समोर आली आहे.
निवडणूक आयोगाकडून आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी एकूण १०,९०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १६५४ उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले, तर ९२६० उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यापैकी ९८३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अशा स्थितीत आता एकूण ८२७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
‘या’ तारखेला होणार मतदान
राज्यात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
यावेळची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक खूपच रंजक असणार आहे. राज्याच्या इतिहासात अशा प्रकारची लढत पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे, जिथे सहा मोठे राजकीय पक्ष दोन मोठ्या आघाड्यांखाली निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.