US Presidential Election 2024 : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची (US Presidential Election 2024) मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या निकालात डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे.
न्यू हॅम्पशायरमधील डिक्सविल नॉच या गावात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या गावात मतमोजणीत एक मनोरंजक ट्विस्ट पहायला मिळाला आहे. मतमोजणीमध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान म्हणजेच प्रत्येकी तीन मते मिळाली आहे. कलामा हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मते 3-3 अशी विभागली गेली आहेत. हे डिक्सव्हिल नॉचच्या इतिहासात पहिल्यांदा घडले आहे. या ठिकाणी ट्रम्प यांना मिळालेली मते सर्वाधिक आहेत. अशा स्थितीत ट्रम्प यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. आणि कमला हॅरिस यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
2016 मध्ये ट्रम्प यांना डिक्सव्हिल नॉचमध्ये केवळ 2 मते मिळाली होती, तर हिलरी क्लिंटन यांना 4 मते मिळाली होती. तर 2020 मध्ये जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा 5-0 असा पराभव केला होता. या लहान गावात मतमोजणी सामान्यत: राष्ट्रीय निवडणुकांसाठी एक मोलाचा कौल मानली जाते. जरी त्याचा प्रभाव फारसा नसला तरी देखील इथे ज्यांना जास्त मते मिळाली आहेत, त्यांचे सरकार अमेरिकेत स्थापन झाले आहे. असे म्हंटले जाते.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि त्यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सुरु असलेली स्पर्धा खरोखरच अभूतपूर्व ठरली आहे.
निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवसांमध्ये, उपाध्यक्ष हॅरिस यांनी आशा, ऐक्य, आशावाद आणि महिला हक्कांच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित केले आहे, तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प हे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर निशाणा साधण्यात कट्टर राहिले आहेत. निवणुकीचा निकाल लागण्याआधीच ट्रम्प यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी विरोधी पक्षाला निवडणूक निकाल स्वीकारण्याचा देखील सल्ला दिला आहे.