Ajit Pawar : राज्यात विधानसभा (Election Commission) निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात रंगली आहे. सर्वच पक्षांकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा देखील जाहीरनामा प्रसिध्द झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 कोटी 30 लाख महिलांना लाभ मिळणार आहे. तसेच वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार असल्याचे देखील जाहीरनाम्यात सांगितले आहे.
राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील आश्वासने
लाडकी बहीण योजना 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार
10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी 10000 रुपये शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन
महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांची पोलीस दलात भरती
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन
शेतकऱ्यांच्या पिकांच्या एमएसपीमध्ये 20 टक्के वाढ करणार
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न
वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार
राज्यात 25 लाख रोजगार निर्माण करण्याचे प्रयत्न करणार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन
वीज बिलात 30 टक्के कपात करण्याचे आश्वासन
सौरऊर्जेला प्राधान्य देण्याचे आश्वासन
अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये मासिक वेतन
प्रशिक्षणाद्वारे 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपयांची मासिक शिष्यवृत्ती
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात 45000 जोड रस्ते जोडण्याचे आश्वासन