Narendra Modi : देश जितका कमकुवत होईल, तितका काँग्रेसला फायदा होईल. काँग्रेस भक्कम झाल्यावर देश असहाय्य होईल. त्यांचा 75 वर्षांचा इतिहास पाहा. त्यांचे पुरावे आजबाजूलाच मिळतील. वेगवेगळ्या जातींमध्ये भांडणं लावणं हेच काँग्रेसचं धोरण आहे. स्वातंत्र्यानं काँग्रेसकडून जातींमध्ये भांडणं लावण्याचं काम करण्यात आलं. ओबीसी समाजाची वेगळी ओळख होऊ नये यासाठी जंग जंग पछाडले. एससी जमातीच्या जाती एकमेकांत संघर्ष करावा ही काँग्रेसची इच्छा आहे. त्यांच्यात संघर्ष असेल तर त्यांच्या मतांमध्ये विभागणी होईल आणि त्यांचा सत्तेत येण्याचा मार्ग सोपा होईल. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. आज (शनिवारी) त्यांनी अकोल्यात जाहीर सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर अनेक आरोप केले आहेत. तसेच महाविकास वर देखील हल्लाबोल चढवला आहे.
यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला एक आवाहन देखील केले आहे.’ ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार येतं ते राज्य काँग्रेसच्या शाही परिवाराचं ATM बनते, काँग्रसेला शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही. देश जितका कमकुवत होईल तितका काँग्रेसला फायदा होईल. काँग्रेसच्या या खतरनाक चालीपासून सावध राहा. एकत्र राहाल तरच सुरक्षित राहाल, असं आवाहन मोदींनी यावेळी जाहीर सभेत केले आहे.
राज्यात ‘या’ तारखेला मतदान
राज्यात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. अशापरिस्थितीत प्रचारासाठी खूप कमी काळ शिल्लक असून, सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या सर्वच नेते प्रचार सभेत व्यस्त आहेत. अशातच महायुतीचे नेते देखील मैदानात उतरले आहे.