Narendra Modi : ‘महायुतीच्या जाहिरनाम्यादरम्यान महाविकास आघाडीचा घोटाळ्यांचा जाहिरनामा ही आला आहे. महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचार, टोकन मनी, बदल्यांचा घोटाळा, अशी टीका पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) अकोल्यातून केली आहे. आज पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांच्या राज्यात दोन सभा पार पडल्या आहेत.
त्यांची पहिली सभा अकोल्यात पार पाडली असून, या सभेतून मोदींनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. या सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या सेवेचे माझ्यासाठी वेगळेच सुख आहे. केंद्रात आमची सरकार येऊन पाच महिने झाले आहेत. मात्र, या पाच महिन्यात लाखो करोड रुपयांच्या योजना सुरु झाल्या. महाराष्ट्रातील इन्फ्रास्टरचे अनेक प्रकल्प यामध्ये आहेत. वाढवण बंदरासाठी ८० हजार कोटींच्या आसपास निधी देण्यात आला आहे.
त्यामुळे देशातील इतर बंदरांपेक्षा अधिक ताकद ‘वाढवण प्रकल्प’ देशाला देईल. तसेच गरीबांना पक्की घरे देण्यात आली आहेत. त्याचबरोबर मोदी पुढे म्हणाले, आजच्या सभेला उपस्थित असणारेच मोदी आहेत, तुम्ही जनतेला वादा द्या, मी तो वादा पूर्ण करेन, तसेच त्यांनी महाविकस आघाडीतील घटक पक्षांच्या कामावर देखील हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक असून, सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. तसेच महायुतीचे नेते देखील प्रचार सभांमध्ये व्यस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभांचा धुराळा सुरु आहे. राज्यात पंतप्रधानच्या एकूण ९ सभा पार परडणार आहेत. कालपासून पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांची शेवटची सभा ही 14 तारखेला होणार आहे.