Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज (सोमवारी) नागपुरात रोड शो करत आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत.
नागपूरमध्ये झालेल्या रोड शोमध्ये देवेंद्र फडणवीस यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. देवेंद्र फडणवीस यांना नेहमीप्रमाणेच जनतेचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास आहे. जनता पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवेल आणि ते पुन्हा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून येतील. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीवर नव्हे तर महायुतीवर जनतेचा विश्वास असून यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी महायुतीच साथ देतील, अशी ग्वाही दादेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा मतदारसंघ माझा परिवार आहे. त्यांनी मला 5 वेळा निवडून दिले आहे. आज मी जो काही आहे तो त्यांच्यामुळेच आहे. लाडकी बहीण योजना ही एक गेम चेंजर योजना आहे आणि मला विश्वास आहे की लाडक्या बहिणी आमच्यासोबत राहतील.’
https://twitter.com/ANI/status/1855842028430758338
फडणवीस पुढे म्हणाले, ‘महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. महायुतीचे लाडके भाऊ पुन्हा निवडून आले तर प्रत्येक महिलेला १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये दिले जाणार आहेत. मात्र, याच्या विरोधात असलेले विरोधी पक्षातले सावत्र भाऊदेखील फिरत आहेत. सर्व बहिणींनी या सावत्र भावांपासून सावध राहावे’, असा टोला देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी लगावला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. २० तारखेला मतदान आणि २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती यांचा थेट सामना आहे. त्यामुळे राज्यात कोणाची सरकार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.