Narendra Modi : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. महायुतीच्या प्रचारासाठी केंद्रातील बडे नेते मैदानात उतरले आहेत. राज्यात पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभांचा धुराळा उडत आहे. नुकतीच योगी आदित्यनाथ अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे एक सभा पार पडली आहे. जिथे त्यांनी एक मोठा दावा केला आहे.
या प्रचार सभेत योगींनी दावा केला आहे की, ‘हिंदूच्या कत्तली या ते विखुरले होते म्हणूनच झाल्या. ते एकत्र असतील तरच सुरक्षित राहतील, असे म्हंटले आहे. तसेच त्यांनी यावेळी, महाराष्ट्राला प्रयोगशाळा होऊ देऊ नका, असे आवाहन देखील केले आहे.
ते पुढे म्हणाले, ‘हिंदू विखुरले तर त्यांच्या जमिनी घेतल्या जातील, या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला आरपारचा निर्णय घ्यायचा आहे, असे देखील योगींनी आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देखील आज राज्यात दोन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. आज ते सोलापूर तसेच पुण्यातील आयोजित सभेला संबोधित करतील. सोलापूर येथील सभा दुपारी पार पडली असून, पुण्यातील सभा सायंकाळी सहा वाजता सुरु होणार आहे.
कधी होणार मतदान?
राज्यात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 20 तारखेला मतदान होणार आहे. तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. राज्यात यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती यांचा थेट सामना आहे. अशास्थितीत राज्यात कोणाचे सरकार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशापरिस्थितीत राज्यात महायुती तसेच महाविकास आघाडी कडून विविध भागात प्रचार सभांचे आयोजन करण्यात येत आहे.