भारतीय संघाने काल रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ११ धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला गेला. टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दमदार फलंदाजी केली आणि त्यानंतर गोलंदाजांनी त्यांना विजयाकडे नेले.टीम इंडियाच्या या विजयाचा खरा हिरो ठरला युवा फलंदाज तिलक वर्मा.आपल्या शतकी खेळीमध्ये तिलक वर्माने 8 चौकार आणि 6 षटकार मारले.तिलक वर्माचे हे टी-20 क्रिकेटमधील पहिले शतक आहे. या कामगिरीनंतर 22 वर्षीय तिलक वर्मा हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
𝗧𝗿𝗲𝗺𝗲𝗻𝗱𝗼𝘂𝘀 𝗧𝗶𝗹𝗮𝗸 🤝 𝗧𝗼𝗻-𝘂𝗽 𝗧𝗶𝗹𝗮𝗸
Scorecard ▶️ https://t.co/JBwOUChxmG#TeamIndia | #SAvIND | @TilakV9 pic.twitter.com/lFlaJc4AdY
— BCCI (@BCCI) November 13, 2024
तिलक वर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने २० षटकांत ६ बाद २१९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला निर्धारित षटकांत सात विकेट्सच्या मोबदल्यात केवळ २०८ धावाच करता आल्या आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सेनने झुंजार खेळी साकारली. मात्र, तो मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने भारता विजयावर शिक्कामोर्तब करू शकला. तत्पूर्वी, त्याने १७ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ५४ धावांचे योगदान दिले.
टीम इंडियाचा हा सेंच्युरियनमधील पहिला विजय ठरला.सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केली. सूर्याने या विजयासह विराटच्या पराभवाचा वचपा घेतला आणि दक्षिण आफ्रिकेचा हिशोब चुकता केला. याआधी दोन्ही संघात 21 फेब्रुवारी 2018 रोजी टी 20 सामना खेळला गेला होता. तेव्हा भारताने विजयासाठी दिलेले 189 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 4 विकेट्स गमावून पूर्ण केले होते. तेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताला पराभूत व्हावे लागले होते. तेव्हापासून टीम इंडिया पराभवाची परतफेड करण्याच्या प्रतिक्षेत होती.