राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके (President Anura Kumara Dissanayake ) यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या नॅशनल पीपल्स पॉवर (NPP) पक्षाने श्रीलंकेत पार अडलेल्या संसदीय निवडणुकीत बहुमत निश्चित केले आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत NPP ने एकूण 4.4 दशलक्ष मतांसह, राष्ट्रीय मतांच्या सुमारे 62 टक्के, म्हणजे 52 जागा मिळवल्या होत्या. जिल्हानिहाय प्रतिनिधित्वाद्वारे पक्षाकडे सध्या 35 जागा आहेत.
समगी जन बलवेगया (SJB) ला 18 टक्के आणि माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचा पाठिंबा असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDF) 5 टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाल्याने विरोधी पक्षांचे लक्षणीय नुकसान झाले आहे. SJB ला 8 जागा मिळाल्या आहेत, तर NDP ला फक्त एक जागा मिळाली आहे.
राजपक्षे कुटुंबाशी संबंधित श्रीलंका पीपल्स फ्रंट (SLPP) मतांच्या संख्येत चौथ्या क्रमांकावर असूनही 2 जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
सप्टेंबरच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या तुलनेत एनपीपीने लक्षणीय सुधारणा केल्याचे राजकीय निरीक्षकांनी सांगितले होते. निवडणुकीत एकूण 8,821 उमेदवार प्रतिस्पर्धी आहेत. या निवडणुकीत आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेत मतदार 22 मतदारसंघांमधून थेट निवडणूक करून 196 सदस्य निवडतात. याशिवाय, उर्वरित 29 जागा निवडणुकीत मिळालेल्या मतांनुसार वाटल्या जातात.
कोलंबोमध्ये बुधवारी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनुरा कुमारा दिसानायके म्हणाले होते की, मला मजबूत संसदेसाठी जनादेश मिळेल अशी आशा आहे. त्यांना 150 जागांवर पूर्ण बहुमत मिळण्याची आशा आहे का, असे विचारले असता ते म्हणाले होते की ,”आम्ही लोकांच्या हिताचे कायदे आणत आहोत, तर आम्हाला दोन तृतीयांश बहुमतही मिळू शकेल”.