इस्रायलने रविवारी मध्य बैरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रवक्त्याचा मृत्यू झाला आहे .याशिवाय पाच जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. शनिवारी हिजबुल्लाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेत्यान्याहू यांच्या घरावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यात नेत्यान्याहू थोडक्यात बचावले होते. दरम्यान, या घटनेनंतर आता इस्रायलने बदला घेत लेबनॉनवरील हल्ले तीव्र केले आहे.इस्रायलने मध्य बैरूतमध्ये हल्ले करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रवक्ता मोहम्मद अफिफ मारला गेला आहे.टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, हिजबुल्लाने मोहम्मद अफिफच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.मध्य बेरूतमधील सीरियन बाथ पार्टीच्या मुख्यालयावर आयडीएफच्या हल्ल्यात अफिफ मारला गेल्याचे सांगण्यात आले आहे.
बैरूतच्या मार इलियास भागात देखील इस्रायलकडून हल्ला करण्यात आला.ज्यात आणखी दोघे ठार झाले तर ५० हुन अधिक लोक जखमी झाले. मार इलियासचा परिसरात दाट लोकवस्ती आहे. इस्रायलच्या विमानांनी या भागात बॉम्बहल्ला केला आहे.
रविवारी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर आग फेकल्याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली.शनिवारी रात्री इस्त्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सीझरिया येथील निवास्थानी दोन फ्लॅश बॉम्ब टाकले गेले. ते फ्लॅश बॉम्ब घराच्या उद्यानात पडल्यामुळे आणि नेतन्याहू आणि त्यांचा परिवार घरी नसल्यामुळे ते बचावले.
नेतन्याहू यांच्या खाजगी निवासस्थानावर या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही हिजबुल्लाह ड्रोनने हल्ला केला होता. त्यावेळी नेत्यनाहू यांना आणि त्यांच्या पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.