बांगलादेशात शनिवारी मुस्लिम जमावाने आणि लष्कराच्या अधिका-यांनी केलेल्या मारहाणीत आणि छळामुळे हृदोय रबी दास नावाच्या २१ वर्षीय हिंदू तरुणाचा मृत्यू झाला आहे . मुस्लीम तरुणीवर प्रेम केल्याने त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना बांगलादेशातील ढाका विभागातील किशोरगंज जिल्ह्यात घडली आहे. येथील करीमगंज उपजिल्हा रहिवासी हृदोय रोबी दास याची शनिवारी १७ नोव्हेंबर २०२४ हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी हृदोय याच्या दुकानातून त्याला आणि त्याच्या चुलत भावाला घेऊन एका अज्ञातस्थळी नेण्यात आले होते. तीन मौलाना आणि इतर काही लोक तसेच स्थानिक प्रशासनातील काहींचा याप्रकऱणात समावेश आहे.
यावेळी असलेल्या काही मुस्लिम मौलानाने त्याला बेदम मारहाण करत अत्याचार केले होते. यानंतर आता त्याचा फोनही हिसकावण्यात आला होता. यानंतर ज्यावेळी हृदोय जखमी झाला तेव्हा त्याला एका रिक्षातून नजीक असलेल्या लष्करी छावणीत पाठवण्यात आले होते. येथे सैनिकांनी हृदोय आणि त्याच्या चुलत भावाला वेगळ्या ठिकाणी दाखल केले गेले.
हृदोयचीही लष्करी छावणीत चौकशी करण्यात आली..त्यानंतर येथून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्याच्या शरीरावर मारहाण केलेल्या खुणा असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तब्येत बिघडल्यानंतर हृदोयला किशोरगंज येथील राष्ट्रपती अब्दुल हमीद वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अद्याप त्याच्या कुटुंबियांना मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही.
https://twitter.com/VHindus71/status/1858049295217299749
कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बांगलादेशातील अधिकाऱ्यांकडून आता या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा आणि या जाणूनबुजून करण्यात आलेल्या हत्येला ‘ड्रग ओव्हरडोसचा बळी ’ म्हणून दाखवण्यात येत आहे. तसेच हृदोय हा ‘तस्कर’ असल्याचे चित्र उभे करण्यात येत आहे.
इकडे भारतात हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढून नंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिज मध्ये भरून ठेवणाऱ्या कट्टरपंथी युवकांना त्यांचा गुन्हा सिद्ध झाला तर त्याची कठोर शिक्षा मिळते का ? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. मात्र लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुली मात्र आपला जीव गमावून बसतात. आणि बांगलादेशात मात्र कट्टरपंथी युवतीवर प्रेम करू पाहणारी हिंदू मुले मात्र जिवंतही राहत नाहीत हे कटू सत्य या घटनेतून पुढे आले आहे.