विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून ९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. अहमदनगर – ५.९१ टक्के,अकोला – ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के, औरंगाबाद-७.५ टक्के, बीड -६.८८ टक्के, भंडारा- ६.२१ टक्के, बुलढाणा- ६.१६ टक्के, चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के, गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के, जळगाव – ५.८५ टक्के, जालना- ७.५१ टक्के, कोल्हापूर-७.३८ टक्के,लातूर ५.९१ टक्के, मुंबई शहर-६.२५ टक्के, मुंबई उपनगर-७.८८ टक्के,नागपूर -६.८६ टक्के,नांदेड -५.४२ टक्के, नंदुरबार-७.७६ टक्के,नाशिक – ६.८९ टक्के, उस्मानाबाद- ४.८५ टक्के, पालघर-७.३० टक्के, परभणी-६.५९ टक्के,पुणे – ५.५३ टक्के,रायगड – ७.५५ टक्के, रत्नागिरी-९.३० टक्के,सांगली – ६.१४ टक्के,सातारा – ५.१४ टक्के, सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के,सोलापूर – ५.७,ठाणे ६.६६ टक्के,वर्धा – ५.९३ टक्के,वाशिम – ५.३३ टक्के,यवतमाळ – ७.१७ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यात एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यासाठी आता मतदारराजा आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलिस यंत्रणा सज्ज आहे.