महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान आज सहा वाजता संपले असून एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात झाली आहे. एक्झिट पोल्समध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष असणार आहे. तसेच वेगवेगळे एक्झिट पोल्स काय काय अंदाज वर्तवतात? ते कुणाच्या बाजूने असतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एक्झिट पोल्सच्या वर्तवण्यात आलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, महायुतीला 129 ते 159 आणि महाविकास आघाडीला 124 ते 154 जागा मिळतील.तसेच महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढाई असणार असे दिसत आहे.मात्र बहुतांश एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार सत्ताधारी महायुती महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर महाविकास आघाडी बहुमतासाठी पुरेश्या जागा मिळवू शकणार नाही.असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रिपब्लिक टीव्ही-पीएमआरक्यू एक्झिट पोलनुसार, महायुती आघाडीला 137-157 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला 126-147 आणि इतरांना 2-8 जागा मिळू शकतात.
मॅट्रिझ एक्झिट पोलने महायुतीला 150-170 जागा आणि महाविकास आघाडीला 110-130 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर इतरांना 8-10 जागा मिळू शकतात.असे सांगितले आहे.
टुडेज चाणक्यच्या अंदाजानुसार महायुती १५२-१५० जागा, माविआ १३०-१३८ जागा आणि इतर ६-८ जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
‘पीपल्स पल्स’ने महायुतीला १७५-१९५ जागा मिळवून निर्णायक विजय मिळवण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यात म्हटले आहे की महाविकास आघाडीला 85-112 जागा मिळतील आणि ‘इतरांना 7-12 जागा मिळतील.
महाराष्ट्र विधानसभेत बहुमताचा आकडा 145 आहे आणि रिपब्लिक टीव्ही-PMARQ च्या अंदाजानुसार महाविकास आघाडी ह्या अंकापर्यंत पोचू शकते असा अंदाज सांगण्यात आला आहे.
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे तर विरोधी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ५८.२२ टक्के मतदान झाले आहे .या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती.