बिहार महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.
“एक अभूतपूर्व कामगिरी! महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल आमच्या हॉकी संघाचे अभिनंदन. त्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केला. त्यांचे यश अनेक आगामी खेळाडूंना प्रेरित करेल,” असे एक्स पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे.
बिहारमधील राजगीर येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय महिला संघाने चीनचा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे .’गोल्डन गर्ल’ दीपिकाच्या या स्पर्धेतील 11व्या गोलच्या जोरावर भारताने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनचा 1 ने पराभव केला आहे .
फायनलमध्ये चीनवर १-० असा विजय मिळवल्यानंतर बुधवारी राजगीर हॉकी स्टेडियमवर भारतीय महिला हॉकी संघाला बिहार महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी राजगीर २०२४ चे चॅम्पियन बनण्यात यश मिळवले आहे. खेळाच्या पहिल्या सहामाहीत दोन्ही संघांनी जोरदार मुसंडी मारली होती पण उत्तरार्धात भारताने दीपिकाच्या गोलमुळे ट्रॉफी मिळवण्यात यश मिळवले.महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही
हॉकी इंडियाने विजयानंतर सर्व खेळाडूंना प्रत्येकी 3 लाख रुपये आणि सर्व सपोर्ट स्टाफसाठी प्रत्येकी 1.5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.आशियाई हॉकी महासंघाने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पोडियम फिनिशर्ससाठी बक्षीस जाहीर केले आहे.
पहिल्या हाफमध्ये गोलशून्यच्या बरोबरीनंतर दीपिकाने उत्तरार्धाच्या पहिल्याच मिनिटाला भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करून खचाखच भरलेल्या बिहार स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली होती.