रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनवर इंटरकॉन्टिनेंटल मिसाइलने (ICBM) हल्ला केला आहे. रशियाने प्रथमच आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागल्याचा युक्रेनचा दावा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल सकाळी 5 ते 7 च्या दरम्यान रशियाने युक्रेनवर ही क्षेपणास्त्रे डागली आहेत.युक्रेनने पाश्चिमात्य क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर रशियाने या हल्ल्याचे उत्तर हाइपरसोनिक इंटरमीडिएट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करून दिले आहे असे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्ट करत अप्रत्यक्षरित्या संपूर्ण जगालाही इशाराच दिला आहे.
या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5,800 किमी आहे. युक्रेनच्या हवाई दलाने रशियन हल्ल्याला दुजोरा दिला आहे. या क्षेपणास्त्रांशिवाय किंजल हायपरसोनिक आणि KH-101 क्रूझ क्षेपणास्त्रेही डागण्यात आली आहेत.
मंगळवारी युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेने दावा केला होता की, रशियन आर्मी आंतरखंडीय क्षेपणास्त्र आरएस-26 रुबेझ डागण्याच्या तयारीत आहे. रशियाने काल रात्री युक्रेनच्या डनिप्रो शहराला लक्ष्य केले. युक्रेनच्या हवाई दलाने आज टेलिग्रामवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कपुस्तिन यार एअर बेसवरुन ही मिसाइल लाँच करण्यात आली ,या भागाला अस्त्रखान सुद्धा म्हणतात.
20 नोव्हेंबर 2024 रोजी युक्रेनच्या इंटेलिजेंसने रशियन सैन्य इंटरकॉन्टीनेंटल बॅलिस्टिक मिसाइल RS-26 Rubezh डागण्याची तयारी करत आहे असे घोषित केले होते.
RS-26 Rubezh मिसाइलचे वजन 36 हजार किलोग्रॅम आहे. एकाचवेळी 150/300 किलो टनची चार शस्त्र वाहून नेण्याची त्यांची क्षमता आहे. ही मिसाइल MIRV टेक्निक सुसज्ज आहे. म्हणजे एकाचवेळी चार टार्गेट्सवर हल्ला करता येईल. ही मिसाइल Avangard हायपरसोनिक ग्लाइड व्हीकल म्हणून सुद्धा ओळखली जाते.लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमध्ये ही इंटर कॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल सर्वाधिक दूरवर हल्ला करू शकतात. तसेच ही जिथून डागली गेली आहेत त्या ठिकाणापासून तब्बल 5 हजार 500 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकतात.