महाराष्ट्रासोबतच देशात झारखंड (Jharkhand Vidhan Sabha Election Result) या राज्याची देखील निवडणूक झाली होती. या राज्यातही निवडणुकीचा कल येण्यास सुरवात झाली आहे. मिळालेल्या ताज्या कलानुसार झारखंड राज्यात इंडिया आघाडी बहुमताच्या दिशेने जात आहे. म्हणजेच झारखंडमध्ये पुन्हा एकदा झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसप्रणित आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा पराभव होत असल्याचे चित्र आहे मात्र झारखंडमध्ये निकालांमध्ये आलेल्या कलानुसार इंडिया आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडून आलेल्या माहितीनुसार झारखंड विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने 50 जागांवर आघाडी घेतल्याने JMM-नेतृत्वाखालील महागठबंधनाने अर्धा टप्पा ओलांडला आहे.
झारखंड मुक्ती मोर्चा ३० जागांवर, काँग्रेस १४ जागांवर, आरजेडी ५ जागांवर आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) (लिबरेशन) – सीपीआय(एमएल)(एल) एका जागेवर आघाडीवर आहे.
ट्रेंडनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 28 जागांवर आघाडी घेतली असून, भाजप 24 जागांवर आघाडीवर आहे, AJSU 2 जागांवर आणि JD(U) आणि LJP (RV) दोन्ही एक-एक जागांवर आघाडीवर आहेत.
झारखंड लोकतांत्रिक क्रांतीकारी मोर्चा (जेएलकेएम), पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा पक्ष असून तो जुगसलाई आणि डुमरी या दोन जागांवर आघाडीवर आहे तर पंकी जागेवर एक अपक्ष उमेदवारही आघाडीवर आहे.
15 राज्यांतील पोटनिवडणुकीच्या निकालांसह 2024 च्या झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. ही मतमोजणी महाराष्ट्रातील २८८ आणि झारखंडमधील ८१ जागांचे भवितव्य ठरवणार आहे.
झारखंडमध्ये काँग्रेस, आरजेडी आणि सीपीआय (एमएल) यांचा समावेश असलेली JMM-नेतृत्व आघाडी आणि AJSU, JD(U) आणि LJP यांचा समावेश असलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडी यांच्यात ही स्पर्धा आहे. एक्झिट पोलने अंदाज वर्तवला होता की एनडीएला 42-47 जागांवर विजय मिळू शकतो, तर जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडीला 25-30 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
झारखंडमध्ये निवडणुकीच्या दिवशी 68.45 टक्क्यांहून अधिक मतदान नोंदवले गेले, जे 2019 च्या निवडणुकीच्या मतदानाच्या 65 टक्क्यांपेक्षा जास्त होते.