बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या इस्कॉनचे गुरु चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना जामीन नाकारल्याबद्दल जनक्षोभामुळे झालेल्या गोंधळाच्या संदर्भात पोलिसांनी आतापर्यंत 39 जणांना अटक केली आहे. तर या हिंसाचारात ठार झालेले चितगावचे वकील सैफुल इस्लाम अलिफ यांच्या कुटुंबीयांनी ४६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, चितगाव महानगर पोलिसांचे अतिरिक्त उपायुक्त काझी तारेक अझीझ यांनी 39 जणांच्या अटकेची पुष्टी केली आहे .कोर्ट परिसरात आणि कोतवाली पोलिस ठाण्यात आंतरराष्ट्रीय इस्कॉन समर्थक आणि इतरांमध्ये झालेल्या हाणामारीच्या संदर्भात तीन गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.अटक करण्यात आलेल्यांवर पोलिसांवर हल्ला, वाहनांची तोडफोड आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे.
हिंसाचारात ठार झालेले चितगावचे वकील सैफुल इस्लाम अलिफ यांच्या कुटुंबीयांनी आज पहाटे ४६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बंदर शहराच्या कोतवाली पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याबाबत, स्टेशन प्रभारी मोहम्मद अब्दुल करीम यांनी सांगितले की, सैफुल यांचे वडील जमाल उद्दीन यांनी तक्रारीत 31 आरोपींची माहिती दिली आहे आणि बाकीचे अज्ञात म्हणून दाखवले आहेत.
चंदन, अमन दास, शुभो कांती दास, बुंजा, राणब, बिधान, बिकाश, रमित, रुमित दास, नयन दास, गगन दास, बिशाल दास, ओंकार दास, बिशाल, राज कपूर, लाला, समीर, सोहेल यांचा समावेश आहे. दास, शिवकुमार, बिगलाल, परश, गणेश, ओम दास, पोपी, अजय, देबी चरण, देब, जॉय, दुर्लव दास आणि राजीव भट्टाचार्य. अशी त्यांची नावे आहेत.
महत्वाची गोष्ट अशी की,मंगळवारी चितगाव न्यायालय संकुलाच्या आवारात झालेल्या हाणामारीत सैफुल इस्लाम यांचा मृत्यू झाला होता.आणि आता या घटनेसाठी वकिलांनी इस्कॉनच्या अनुयायांना जबाबदार धरले आहे.