विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस बजरंग लाल बागड़ा यांनी बांगलादेश प्रशासनाने इस्कॉन मंदिराचे गुरु चिन्मय कृष्ण दास यांना केलेल्या अटकेबद्दल चिंता व्यक्त करत तेथील प्रशासनाने केलेली ही भ्याड आणि अलोकतांत्रिक कारवाई असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाच्या या भ्याड आणि मनमानी व्यवहाराचा विश्व हिंदू परिषद तीव्र निषेध करत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. बांगलादेश सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी इस्कॉन किंवा इतर हिंदू समाज संघटनांनी आजवर जी काही कारवाई केली, ती त्यांनी लोकशाही पद्धतीने समोर आणली होती. तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला प्रत्युत्तराच्या स्वरूपात प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र समाजातील एका वर्गाचे नेतृत्व करणाऱ्या शांतताप्रिय आणि लोकशाहीवादी नेत्याला अशा अलोकतांत्रिक पद्धतीने अटक करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे हे अमानवीय आहे तसेच हिंदू समाजाच्या मानवी हक्कांचेही उल्लंघनही आहे.
बागड़ा म्हणाले आहेत की, बांगलादेशात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये इस्लामी घटकांसह डावे तिथल्या हिंदू समाजाचे दडपशाही करत आहेत, याबाबत आम्ही सुरवातीपासून आवाज उठवत आहोत. मात्र संपूर्ण जागतिक समुदाय आणि जागतिक संघटनांनी मात्र या घटनेबाबत म्हणावी तितकी चिंता व्यक्त केली नाही, हे दुर्दैव आहे. संपूर्ण जागतिक समुदायाने तिथल्या घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करावे, त्याचे गांभीर्य समजून घ्यावे आणि हिंदूंच्या मानवी हक्कांचे रक्षण व संरक्षण करण्यासाठी बांगलादेशच्या प्रशासनावर दबाव आणावा, अशी विश्व हिंदू परिषदेची अपेक्षा असल्याचे बागड़ा म्हणाले आहेत.
तसेच या प्रकरणी भारत सरकारची प्रतिक्रिया अत्यंत सावध आणि अत्यल्प असल्याचेही विहिंपचे सरचिटणीस बागड़ा म्हणाले आहेत एखाद्या सार्वभौम देशाच्या स्वायत्ततेला दुसऱ्या देशाच्या सरकारने अश्या प्रकारे आव्हान देणे योग्य नाही, हे खरे आहे, परंतु एका मोठ्या हिंदू समाजावर अत्याचार करण्याचा हा प्रकार म्हणजे संपूर्ण जग, सर्व शेजारी देश, भारतीय सरकार या हे एका ठराविक काळासाठी ठीक आहे, परंतु दीर्घकाळ मात्र हे मान्य करता येणार नाही.
जागतिक समुदायाने या सर्व घटनांची दखल घेऊन हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी बांगलादेशच्या प्रशासनावर दबाव आणला पाहिजे, असे विश्व हिंदू परिषदेचे मत आहे. तसेच आम्ही इस्कॉनचे मुख्य पुजारी चिन्मय कृष्ण दास प्रभू यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करतो आणि यापुढे कोणत्याही प्रकारचे हिंदू नेते, हिंदू पुजारी, धर्मगुरू यांना विनाकारण अटक करण्याच्या मानसिकतेतून बांगलादेश सरकारने बाहेर पडावे अशी आमची अपेक्षा आहे.असे बागड़ा यांनी सांगितले आहे.