लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा, आप खासदार संजय सिंह आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी अदानींच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या आवारात निदर्शने केली आहेत.
आंदोलक नेत्यांनी बॅनर धरत तसेच घोषणाबाजी करत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील आरोपांबाबत संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशीची मागणी केली आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की,इंडिया आघाडीच्या नेत्यांचा हा निषेध संसदेत गेल्या 6 दिवसांपासून विरोधकांनी केलेल्या निषेधाचा आज शेवट आहे. ते पुढे म्हणाले की, यापुढे विरोधी पक्ष संसदेच्या कामकाजात सहकार्य करतील.
हा सत्ताधारी पक्षासाठी एक प्रकारचे स्पष्ट संकेत आहे की त्यांच्या अनेक धोरणांना देशभरात जोरदार विरोध झाला आहे. आज सकाळपासून आम्ही सभागृहात सहकार्य करणार आहोत.
सीपीआयचे खासदार पी संतोष कुमार म्हणाले की विरोधक येथे ‘लोकहितवादी मुद्दे’ मांडण्यासाठी आहेत आणि विरोधाच्या नवीन मॉडेलसह ते करतच राहतील. सभागृहाचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी विरोधी पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करतील यावर त्यांनी भर दिला.
ते म्हणाले,आहेत की, इंडिया आघाडी काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत आपला विरोध सुरूच ठेवेल. अदानी संबंधित घोटाळा, मणिपूर, संभल – इत्यादी मुद्द्यांची आम्ही आधीच 267 नोटिसा दिल्या आहेत, हे आमच्यासाठी स्पष्ट आहे आणि आम्ही निषेध चालूच ठेवणार आहोत.
अदानी मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी केलेला विरोध आणि मणिपूर आणि संभलमधील हिंसाचारामुळे हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच संसदेचे कामकाज ठप्प आहे.२५ नोव्हेंबरपासून सुरु झालेले लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज विरोधकांच्या गोंधळामुळे सारखे स्थगित करावे लागत होते. संसदेचे हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.