भारतीय किसान संघाचा महाराष्ट्र राज्याचा अभ्यास वर्ग वेरूळ टांका आश्रम येथे दिनांक 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2024 रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला. या अभ्यास वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय संघटन मंत्री माननीय दिनेशजी, प्रदेशाध्यक्ष पंडितराव वारंगे, प्रांत अध्यक्ष बाबुराव देशमुख, महामंत्री कैलाजी ढोले, मदनराव देशपांडे, क्षेत्र संघटन मंत्री दादा लाड, प्रांत संघटन मंत्री चंदनजी पाटील तसेच अखिल भारतीय उपाध्यक्ष कपिलाताई मुठे यांची उपस्थिती होती.
अभ्यास वर्गामध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित मूलभूत चिंतन व धोरणे यावर चर्चा करण्यात आली. विशेषतः जीएम बियाण्यांसंदर्भात भारतीय किसान संघाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कृषी क्षेत्रातील घटक व सामाजिक संस्थांची मते जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. जीएम बियाण्यांच्या प्रयोगशाळा चाचण्या यशस्वी झाल्याशिवाय फिल्ड ट्रायल्स करण्यास भारतीय किसान संघाचा विरोध कायम आहे.
मात्र भारतीय किसान संघाने एकजूट, निष्ठा आणि सामर्थ्याने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आपले ध्येय पुनरुज्जीवित केले आहे.
महत्त्वाचे निर्णय आणि उपक्रम:
1. कृषी आणि ग्रामीण विकासासाठी प्रभावी कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय.
2. पीकवार नीतिनिर्धारणासाठी अभ्यास गटांची स्थापना.
3. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर जनजागरण अभियान सुरू.
4. मार्च 2024 मध्ये विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांचा महामोर्चा आयोजित.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
1. उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी भाव व खरेदीची हमी.
2. शेतकऱ्यांवर लादलेली जीएसटी रद्द करणे.
3. पाणंद शेत रस्त्यांच्या समस्येचे समाधान.
4. जंगली शापदांच्या उपद्रवापासून संरक्षणासाठी उपाययोजना.
5. बोगस बियाणे व भेसळयुक्त कृषी निविष्ठांविरोधात कठोर कारवाई.
6. प्रशासनाच्या असमवेदनशीलतेविरोधात ठोस भूमिका.
या अभ्यास वर्गात प्रदेश कार्यकारिणीची निवड करण्यात आली:
प्रदेशाध्यक्ष : – मुगुटराव भिसे
उपाध्यक्ष : – बाबुराव देशमुख, बळीराम सोळंके
महामंत्री : – किशोर ब्रम्हनाथकर
मंत्री : – कैलास ढोले, मदन देशपांडे
संघटन मंत्री : – दादा लाड
सदस्य : – चंदन पाटील, बबनराव केंजळे, ॲड. अजय तल्हार