Eknath Shinde : महाराष्ट्र्रात आज सायंकाळी साडेपाच वाजता भाजप नेते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. शपथविधी सोहळा आजाद मैदानावर पार पडणार असून, या शपथविधी सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यसह केंद्रातील अनेक मान्यवर नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागले असून, या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले, तसेच राज्यात महायुतीला आघाडी मिळाली. मात्र, निकाल लागल्यानंतरही राज्यात राजकीय अनिश्चितता होती. राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न महायुती समोर होता, अखेर काल मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला आणि देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली.
मात्र, यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात होते. अशास्थितीत अगदी आतापर्यंत म्हणजे शपथविधीच्या काही तास अधीपर्यंत ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नसल्याचे म्हंटले जात होते. मात्र, शिवसेना आमदारांनी केलेल्या मनधरणीनंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार झाले आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी आज (गुरुवारी) दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी यासंबंधीचे पात्र आपण पत्र घेऊन राजभवनात जात असल्याचे देखील म्हंटले.
दरम्यान, शिवसेना नेते उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिवसेना आमदारांच्या भावना सांगितल्या. आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार नसतील तर शिवसेनेचा कोणताही मंत्री शपथ घेणार नाही, असेही त्यांनी यावेळेला स्पष्ट केले. अखेर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास तयार झाले. त्यानंतर उदय सामंत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले आहे फडणवीस यांच्याशी यासंबंधी चर्चा केली.