Eknath Shinde : राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी सोहळा सुरु झाला असून, अनेक मान्यवर नेते आझाद मैदानावर पोहचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मंचावर पोहचले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक मान्यवर नेते या शपथविधीला उपस्थित आहेत.
भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत. तसेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी देखील उपस्थित आहे. महाराष्ट्रातील कलाकार तसेच खेळाडूंनी देखील हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींनी देखील या शपथविधीला हजेरी लावली आहे.
दरम्यान, आजफक्त तीन जणांचा शपथविधी पार पडणार असून, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार शपथ घेतील.