वृंदावनमधील वात्सल्यग्रामच्या संचालिका साध्वी ऋतंभरा यांनी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्या बांगलादेशाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराने दु:खी होणार नाही असा या देशात कोणीच नसेल. सध्या आपल्या देशाच्या सरकारने पुढाकार घेतला तरी आपले संबंध (बांगलादेशशी) तेव्हाच चांगले राहतील जेव्हा आपल्या भावनांचा तिथे आदर केला जाईल. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तिथे हिंदू महिलांच्या इज्जतीवर घाला घातला जात आहे. असा जेव्हा देशच शत्रू बनतो तेव्हा खूप त्रास होतो.मात्र आता भारत सरकारनेही आता थेट पुढाकार घेतला आहे. जोपर्यंत आपल्या भावनांचा आदर केला जातो तोपर्यंतच आपले संबंध चांगले राहू शकतात. मात्र आपल्या मूळ धार्मिक श्रद्धांवर परिणाम होणार नाही,असे वातावरण आपल्या आजूबाजूला असण्याची गरज आहे.
साध्वी ऋतंभरा पुढे म्हणाल्या की, हिंदू जातींनी नक्कीच संघटित व्हायला हवे. संघटनेत ताकद आहे, आपण सर्व एकजूट राहू, तरच भविष्य आणि वर्तमान सुरक्षित राहील. मी कोणत्याही धर्माच्या लोकांना बांगलादेशात घडणाऱ्या घटनांवर आवाज उठवण्याचे आवाहन करते. जगभर जिथे जिथे ही दृश्ये पाहायला मिळतात तिथे अत्याचार खूप झाले आहेत, हे थांबायला हवे. भारत सरकारच्या सध्या घेतलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले आहे.