Ravichandran Ashwin : टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात द गाबा येथे झालेल्या कसोटी सामन्यानंतर अश्विनने ही घोषणा केली आहे.
अश्विनच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, गोलंदाजीसोबतच त्याने फलंदाजीतही कमाल दाखवली आहे. अश्विनने कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीनंतर त्याने पत्रकार परिषदेत आपली त्याने निवृत्ती जाहीर केली आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. या कसोटी सामन्यानंतर अश्विनने निवृत्ती जाहीर केली. या पत्रकार परिषदेत अश्विनसोबत कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता. निवृत्तीची घोषणा करताना अश्विन म्हणाला, ‘भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस आहे. माझ्या मते युवा खेळाडूंनी संघात येऊन आपली भूमिका निभावण्याची हीच योग्य वेळ आहे.”
अश्विनची आतापर्यंची कारकीर्द
अश्विनने भारतासाठी 106 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 3503 धावा केल्या. अश्विनने कसोटीत 6 शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 124 धावा होती. त्याने अनेक वेळा कठीण परिस्थितीत भारतासाठी दमदार कामगिरी केली आहे. अश्विनने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही कमाल दाखवली. या काळात त्याने 537 विकेट घेतल्या. अश्विनची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे कसोटी डावात ५९ धावांत ७ विकेट्स घेणे.
एकदिवशीय आणि टी-20 मधली कामगिरी!
अश्विनने भारतासाठी 116 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये 707 धावा केल्या आहेत. यासोबतच 156 विकेट्सही घेतल्या आहेत. 25 धावांत 4 विकेट ही अश्विनची वनडे सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. अश्विनने भारतासाठी 65 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत 72 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने या फॉरमॅटच्या 19 डावांमध्ये 184 धावा केल्या आहेत.