बांगलादेशाचे नेते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भारतविरोधी वक्तव्य करत आहेत. अशातच आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे ‘सल्लागार’ म्हणून काम करत असलेल्या महफूज आलम याने फेसबुकवर एक नकाशा पोस्ट केला आहे. ज्यामध्ये बंगाल, आसाम आणि त्रिपुरा बांगलादेशचा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर लवकर हे भाग ताब्यात घेणार असल्याचे देखील आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
महफूज आलम हा बांगलादेशातील विद्यार्थी चळवळीतून जन्मलेला नेता आहे. ज्याच्यामुळे शेख हसीना यांना देश देश सोडावा लागला होता. तो बंडाचा सूत्रधार मानला जातो. सध्या महफूज युनूस यांच्या सरकारमध्ये विशेष सहाय्यकपद भूषवत आहे. त्याच्या सल्ल्याशिवाय सरकार कोणताही निर्णय घेत नाही. नुकतेच पार पडलेल्या न्यूयॉर्कमधील क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्ह इव्हेंटमध्ये युनूस यांनी त्याचे खूप कौतुक केले होते. महफूज आलम इस्लामिक भाषणांसाठी ओळखला जातो.
https://twitter.com/bdwatch2024/status/1868909966456999994
कोणती पोस्ट केली होती शेअर?
महफूज आलम याने 16 डिसेंबर 1971 रोजी विजय दिनानिमित्त भारताविरुद्ध सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. विजय दिवस हा बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामातील पाकिस्तानी सैन्यावर बांगलादेशी सैन्याच्या विजयाचे प्रतीक आहे. त्याच दिवशी महफूज यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती.
पोस्टमध्ये महफूज आलम यांनी ईशान्य आणि उत्तर भारतात सांस्कृतिक असंतोष भडकवण्याचा प्रयत्न केला. यासोबतच एक वादग्रस्त नकाशा सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरा बांगलादेशचा भाग असल्याचे दाखवण्यात आले. यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाद पेटला त्यांनतर महफूज याने आपली पोस्ट डिलीट केली.