मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात नीलकमल ही प्रवासी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. ही बोट बुडाली तेव्हा त्यामध्ये अनेक प्रवासी होते.तसेच ती प्रवाशांना घेऊन एलिफंटा केव्ह्जकडे जात होती. यामध्ये जवळपास 20 ते 25 जण अडकल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली होती. आता या अपघातामध्ये तीन प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये जवळपास 80 प्रवासी होते. त्यापैकी 77 जणांना वाचवण्यात यश आले असल्याची माहिती समोर आली आहे. जी स्पीड बोट या प्रवासी बोटीला धडकली ती नेव्हीची होती, असेही सांगितले जात आहे. या बोटीमध्ये लहान मुलं, अनेक कुटुंब होती.
या घटनेबाबत बोटीच्या मालकाने प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे की, प्रवाशांना घेऊन ही बोट एलिफंटा लेण्यांकडे जात होती.या बोटीची क्षमता १३० प्रवाशांची होती आणि अपघातावेळी बोटीत ८० प्रवासी होते.
सध्या नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.