राष्ट्रीय राजकारणातील दिग्गज नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी गुरुग्राम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकारणात शोककळा पसरली आहे. माहितीनुसार, ओमप्रकाश चौटाला यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे.
उद्या सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव तेजा खेडा मळ्यात अंतिम दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि INLD प्रमुख ओम प्रकाश चौटाला यांनी राजकारणात अमिट छाप सोडली,ते ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांच्या पाठी नेहमी खंबीरपणे उभे असत. सत्तेत असल्यावर आणि विरोधात असतानाही त्यांच्या भाषणात शेतकरी आणि ग्रामीण भागावर भाष्य असायचे
हरियाणातील सर्वात सक्रिय नेता म्हणूनही त्यांची ओळख होती.हरियाणाचे माजी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी ओम प्रकाश चौटाला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. इनेलो सुप्रीमो आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी ओम प्रकाश चौटाला यांचं असे जाणे वेदनादायी आहे.त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. त्यांनी आयुष्यभर हरियाणाची सेवा केली. त्यांच्या जाण्याने देश आणि हरियाणाच्या राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे, असे नायब सिंग सैनी म्हणाले आहेत.