दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास (डब्ल्यूसीडी) विभागाने जाहीर केले आहे की, 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी घोषित केलेल्या कोणत्याही कल्याणकारी योजनेची अधिकृतपणे अधिसूचित केलेली नाही हे समोर येताच भाजपने आता आप संस्थापक अरविंद केजरीवाल यांना फटकारले आहे .
दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केजरीवालांवर जनतेची दिशाभूल केल्याचा आणि अस्तित्वात नसलेल्या योजनेचा प्रचार करून ‘डिजिटल फसवणूक’ केल्याचा आरोप केला आहे. सचदेवा म्हणाले आहेत की, “अरविंद केजरीवाल दिल्लीतील जनतेला डिजिटल फसवणुकीकडे घेऊन जात आहेत. दिल्लीत आपचे सरकार आहे, आणि त्यांचाच विभाग जनतेला अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचा इशारा देत आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीच्या जनतेची फसवणूक करत आहेत हे उघड आहे “.
केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांनी अरविंद केजरीवाल आणि त्यांचे नेते दिल्लीतील जनतेशी सतत खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे .”आपने 2015 मध्ये 500 शाळांचे आश्वासन दिले होते, पण त्या प्रत्यक्षात आल्या नाहीत .20 रुग्णालये आणि 20 महाविद्यालये सुरु करण्याचे आश्वासन दिले होते, तेही खोटे ठरले आहे. अलीकडे, 2.5 वर्षांपूर्वी, पंजाबच्या माता-भगिनींनाही पंजाबच्या निवडणुकीपूर्वी आश्वासने देण्यात आली होती. मात्र त्यांची अंमलबजावणी कधीच झाली नाही.
दरम्यान, भाजप खासदार कमलजीत सेहरावत म्हणाले आहेत की , “जर सरकारी कर्मचाऱ्याने फॉर्म जमा करण्यास सुरुवात केली, तर याचा अर्थ या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे असा होतो. मात्र प्रत्यक्षात असे काहीच दिसत नाही यावरून दिल्ली सरकारने संपूर्ण व्यवस्थेची कशी खिल्ली उडवली हे स्पष्ट झाले आहे. 10 वर्षे झाली तरी त्यांनी कधीही अश्या योजना राबवल्या नाहीत.
तत्पूर्वी आज, दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास (WCD) विभागाने 2025 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टी (AAP) ने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजने’ संदर्भात स्पष्टीकरण जारी करत म्हंटले आहे की , अशी कोणतीही योजना अधिकृतपणे अधिसूचित केलेली नाही.हे वृत्त राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्येही जाहीर करण्यात आले आहे .