Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राज्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी काँग्रेसचे राज्यभर तीव्र आंदोलन

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 25, 2024, 01:17 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपमान केल्याची भूमिका कॉँग्रेसने घेतली आहे. कॉंग्रेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी अमित शाह यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने काल राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढून भाजपा व अमित शाह यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केले आहेत.

लातूरमध्ये माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोटार सायकल रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नांदेडमध्ये शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.

चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभाताई धानोकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात माजी आमदार जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी यांनी सहभाग घेऊन भाजपा व अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे .अमरावती मधील मोर्चात जिल्हाध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

अकोला महानगर काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर अमित शाह यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे . अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अकोला महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे, माजी आमदार बबनराव चौधरी, प्रकाश तायडे, अशोक अमानकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीनेही अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, अॅड बाबासाहेब भोंडे, प्रा. संतोष आंबेकर, गणेशराव पाटील, शहराध्यक्ष दत्ताभाऊ काकस, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पालघरमध्ये काँग्रेसनेही डॉ, बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढून भाजपा व अमित शाह यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी काँग्रेसने अमित शाह व भाजपाविरोधात सुरु केलेले आंदोलन यापुढेही सुरुच राहणार आहे. जालनामध्ये शुक्रवारी आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख व मा. आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Tags: akolaAmit shahcongressdr.babasaheb ambedkar sanman morchamaharshtra newspalgharTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.