कझाकिस्तानमध्ये आज, अझरबैजानचे प्रवासी विमान कोसळले आहे . बाकूहून रशियाला जाणाऱ्या या विमानात 105 प्रवासी आणि 5 क्रू मेम्बर्स होते. वातावरणातील धुक्यामुळे अझरबैजान एअरलाइन्सच्या या विमानाचा मार्ग बदलण्यात आला. होता.
या विमान अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. कझाकिस्तानच्या अकुत विमानतळाजवळ लँडिंग करताना विमानाचा तोल सुटला आणि जमिनीवर आदळताच आग लागली हे त्या व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. अपघातग्रस्त विमानातील अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून 25 जणांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती पुढे आली आहे मात्र, जखमींच्या संदर्भातील तपशील अद्याप पुढे येऊ शकलेला नाही. धुक्यामुळे हा विमान अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
सध्या 52 अग्निशमन दल आणि कझाकिस्तानच्या 11 अग्निशमन सेवा बचावकार्यात गुंतल्या आहेत.अझरबैजान एअरलाइन्सचे म्हणणे आहे की क्रॅश झालेले विमान एम्ब्रेर 190 विमानाचे होते ज्याचा क्रमांक J2-8243 होता. यामध्ये अजरबैजानी आणि रशियन नागरिक होते.