वक्फ बोर्डाच्या माध्यमातून गैर-हिंदूंनी मंदिरांवर अतिक्रमण केल्याचा आरोप करत वक्फ कायदा रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेने केली आहे.तसेच मंदिरांच्या जमिनींवरील अतिक्रमणांविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी मंदिर ट्रस्टने ‘जिथे मंदिर आहे तिथे आरती’ करण्याचा ठरावही मंजूर केला आहे .
महाराष्ट्र मंदिर महासंघ, श्री जीवदानी देवी संस्थान, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान, श्री साई पालखी निवारा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारपासून सुरू झालेल्या तिसऱ्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीत श्री साई पालखी निवारा येथे आयोजित या परिषदेत महाराष्ट्रातील 875 हून अधिक मंदिर प्रतिनिधी सहभागी झाले होते.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, महाराष्ट्र मंदिर न्यासने मंदिरांच्या जमिनींवरील अतिक्रमणाविरोधातील लढ्याला बळ देण्याचे आवाहन केले आणि वक्फ कायदा रद्द करण्याची मागणी केली. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून अहिंदूंनी मंदिरांच्या जमिनींवर अतिक्रमण केल्याचा आरोप मंदिर महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक सुनील घनवट यांनी केला आहे.यासाठी “अशा अतिक्रमणाचा सामना करण्यासाठी वक्फ कायदा रद्द करावा” अशी मागणी त्यांनी केली.
मंदिरांचे अतिक्रमण रोखण्यासाठी हिंदूंना त्यांच्या जवळच्या सर्व मंदिरांमध्ये दररोज आरती करण्याचे आवाहन करून ‘जिथे मंदिर आहे तिथे आरती’ करण्याचा ठराव परिषदेने संमत केला. दुसऱ्या दिवशी 108 मंदिरांमध्ये हिंदू धर्म आणि संस्कृतीची माहिती देणारे फलक लावणे, 100 हून अधिक मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करणे आणि मंदिरांमध्ये मुलांसाठी सांस्कृतिक शिक्षण वर्ग सुरू करणे यासारख्या उपक्रमांवर चर्चा झाली.
विनायक सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी घोषणा केली की त्यांची संस्था स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मंदिरातील नोकऱ्यांसाठी ‘हिंदू कार्यबल’ तयार करण्यासाठी काम करत आहे. “हलाल सर्टिफिकेशनद्वारे धार्मिक प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला जात असताना, आम्ही मंदिरांमध्ये किंवा आसपास काम करणाऱ्या हिंदू व्यापाऱ्यांसाठी ‘ओम प्रमाणपत्र’ सुरू केले आहे. याव्यतिरिक्त, मंदिरांमध्ये फक्त हिंदू कामगार असतील याची खात्री करण्यासाठी आम्ही लवकरच एक ‘हिंदू वर्कफोर्स’ तयार करू, जिथे फक्त हिंदूंनाच काम दिले जाईल.असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले आहे.
घनवट यांनी प्रयागराज येथील आगामी महाकुंभ मेळ्यात केवळ हिंदूंनाच कुंभमेळा परिसरात व्यापार करण्याची परवानगी देण्याच्या आखाडा परिषदेच्या निर्णयाचे कौतुक केले.
“जे हिंदू देवतांवर विश्वास ठेवत नाहीत त्यांचीच मंदिर परिसरात दुकाने आहेत आणि ते प्रसाद, फुले इत्यादी विकतात. शिवाय, ते ‘थूक जिहाद’द्वारे वस्तूंवर थुंकतात त्यामुळे अश्या इतर धर्माच्या दुकानांना परवानगी नसणे हा उपक्रम राबवला जाणे आवश्यक आहे.