माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या स्वतंत्र स्मारकाची मागणी करत असलेल्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर आणि कॉंग्रेस पक्षावर पक्षपातीपणाचा आरोप करत टीका केली आहे.
शर्मिष्ठा यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हंटले आहे की,ऑगस्ट 2020 मध्ये त्यांचे वडील आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले, तेव्हा याच काँग्रेस नेतृत्वाने काँग्रेस कार्यकारिणीची शोकसभा आयोजित करणे आवश्यकही मानले नव्हते.
त्यावेळी काँग्रेस नेतृत्वाने या मुद्द्यावरून आपली दिशाभूल केली, असा दाखला त्यांनी यावेळी दिला आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांना सांगितले की, ही प्रथा भारतीय राष्ट्रपतींना लागू होत नाही. मात्र हा युक्तिवाद निरर्थक असल्याचे सांगून शर्मिष्ठा यांनी सांगितले की, वडिलांच्या डायरीतून त्यांना यथावकाश आढळून आले की, माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांचे निधन झाल्यावर शोकसभा बैठक बोलावण्यात आली होती आणि शोकसंदेश स्वतः प्रणव मुखर्जी यांनीच लिहिला होता.
When baba passed away, Congress didnt even bother 2 call CWC 4 condolence meeting. A senior leader told me it’s not done 4 Presidents. Thats utter rubbish as I learned later from baba’s diaries that on KR Narayanan’s death, CWC was called & condolence msg was drafted by baba only https://t.co/nbYCF7NsMB
— Sharmistha Mukherjee (@Sharmistha_GK) December 27, 2024
गांधी घराण्याव्यतिरिक्त इतर दिग्गज नेत्यांकडे पक्षाने नेहमीच दुर्लक्ष केले, असा आरोपही शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसवर केला आहे. या मुद्द्यावर त्यांनी सी.आर. त्यात केशवन नावाच्या व्यक्तीच्या पोस्टचा संदर्भ दिला आहे, ज्यात म्हटले आहे की काँग्रेसने अनेक राज्य नेते आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केवळ गांधी घराण्याचे सदस्य नसल्यामुळे नेहमीच दुर्लक्ष केले आहे .
यासोबत त्यांनी २००४ ते २००९ या काळात डॉ. मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार आणि फायनान्शिअल एक्स्प्रेसचे माजी संपादक असलेले डॉ. संजय बारू यांनी लिहिलेल्या ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकाचा दाखला दिला आहे . या पुस्तकात म्हटले आहे की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारकडून 2004 मध्ये दिवंगत पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांचेही 10 वर्ष पंतप्रधान असून सुद्धा दिल्लीत कोणतेही स्मारक बांधले गेले नाही.बारू यांनी त्यांच्या पुस्तकात असाही दावा केला आहे की, काँग्रेस तर राव यांचे अंत्यसंस्कार दिल्लीऐवजी त्यांच्या मूळ गावी हैदराबादमध्ये करण्याच्या बाजूने होती.