टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलिया विरूद्ध चौथ्या टेस्ट मालिकेत खणखणीत शतक ठोकत नवा इतिहास घडवला आहे. नितीशने 176 बॉलमध्ये नाबाद 105 धावा केल्या आहे. या खेळीत त्याने 10 चौकार आणि एक षटकार लगावला आहे.तसेच वयाच्या २१व्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी शतक झळकावत आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक केले आहे. नितीश रेड्डी आता ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. नितीश रेड्डीने फक्त त्याचे शतकच पूर्ण केले नाही तर त्याने मेलबर्न कसोटीत भारताचे आव्हान कायम ठेवले आहे. नितीश रेड्डी १०५ धावा करत नाबाद परतला आहे. तर वॉशिंग्टन सुंदरबरोबर त्याने शतकी भागीदारी रचत भारताची धावसंख्या ३५८ वर नेली आहे.टीम इंडिया संकटात असताना नितीश रेड्डीने अफलातून खेळी केली अन् टीम इंडियाचा फॉलोऑन टाळला. तसेच टीम इंडियाला त्याने विजयाची दिशा देखील दाखवली आहे .
नितीश रेड्डीला आंतरराष्ट्रीय कसोटी खेळताना पाहण्यासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्याच्या या शतकानंतर त्याचे आई,वडिल आणि बहिण भावुक होत आनंद साजरा करताना दिसले.यावेळी नितीश कुमारच्या वडीलांना मुलाचे शतक बघून आनंदाने रडू कोसळले.
NITISH CENTURY!
A glorious lofted drive brings up the milestone!
His dad in tears in the stands, what a moment 🙌#AUSvIND pic.twitter.com/W1SJNHlN4J
— 7Cricket (@7Cricket) December 28, 2024
यानंतर खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला आहे. मात्र नितीशच्या दमदार खेळीने टीम इंडियाचा फॉलोऑन टळला आहे. तसेच टीम इंडियाला त्याने विजयाची दिशा देखील दाखवली आहे
ऑस्ट्रेलियामध्ये नितीश रेड्डीपेक्षा कमी वयात शतक झळकावणारे एकमेव भारतीय खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर आणि ऋषभ पंत.त्यांच्यानंतर आता या यादीत नितीश रेड्डी याचे नाव समाविष्ट होणार आहे..