भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हंपी यांनी इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करून दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे . या विजयासह दुसऱ्यांदा वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणाऱ्या त्या भारतातील पहिली महिला बुद्धिबळपटू ठरल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी कामगिरी करणाऱ्या त्या दुसऱ्या बुद्धिबळपटू ठरल्या आहेत.
37 वर्षीय हंपी यांनी 11 पैकी 8.5 गुणांसह स्पर्धा पूर्ण केली.आणि यासह विजेतेपद पटकावले.अंतिम फेरी सुरू होण्यापूर्वी सहा खेळाडू 7.5 गुणांसह कोनेरू हंपी सोबत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर होते. या खेळाडूंमध्ये जू वेनझुन, कॅटरिना लागनो, हरिका द्रोणावल्ली, अफरोजा खामदामोवा, टॅन झोंग्यी आणि इरीन या खेळाडूंचा समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व खेळाडूंचे सामने अनिर्णित सुटले, परंतु हंपी यांनी इंडोनेशियाच्या इरिन सुकंदरचा अंतिम फेरीत पराभव केला आणि विजेतेपद सुद्धा पटकावले. 2023 साली हंपीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु यावेळी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत त्यांनी विजेतेपद पटकावले आहे.
या विजयासह हंपी यांनी भारतीय बुद्धिबळासाठी वर्षाचा शेवट विशेष केला आहे. त्यांची ही कामगिरी अभूतपूर्व होती. यापूर्वी 2019 साली जॉर्जिया येथे त्यांनी वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकली होती. याशिवाय हंपी यांनी अनेक विक्रम केले आहेत.मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी 2012 च्या आवृत्तीत कांस्यपदक जिंकले होते. अलीकडेच गुकेशने वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्येच इतिहास रचला होता. सिंगापूर येथे झालेल्या शास्त्रीय बुद्धिबळ जागतिक स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून डी गुकेश चॅम्पियन बनला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हंपी कोनेरू यांचे 2024 फिडे (FIDE- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) महिला जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे . तसेच लाखो लोकांना प्रेरणादायक ठरणाऱ्या त्यांच्या धैर्य आणि निर्धाराचे, त्यांनी कौतुक केले आहे .एक्सवर पोस्ट करत ते म्हणाले आहेत की,
“2024 फिडे महिलांची जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल @humpy_koneru चे अभिनंदन! तिचे धैर्य आणि निर्धार लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.हा विजय आणखी ऐतिहासिक आहे कारण हे तिचे दुसरे जागतिक जलदगती विजेतेपद आहे आणि अशी अभूतपूर्व कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय ठरली आहे.”
Congratulations to @humpy_koneru on winning the 2024 FIDE Women’s World Rapid Championship! Her grit and brilliance continues to inspire millions.
This victory is even more historic because it is her second world rapid championship title, thereby making her the only Indian to… https://t.co/MVxUcZimCc pic.twitter.com/nndIak2OvI
— Narendra Modi (@narendramodi) December 29, 2024