महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षानिमित्त मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मंत्र्यांना पुढील 100 दिवसांसाठी टार्गेट देण्यात येणार आहे.
या बैठकीत अवकाळी पाऊस, आरक्षणाचा वाद, बीड सरपंच खून, आगामी महापालिका निवडणुकीवरही चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याबरोबरच त्यांच्या कामाच्या आधारेही कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याबाहेर असल्याने ते या बैठकीला गैरहजर असतील असे सांगितले जात आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक असणार आहे. त्यामुळे सर्व मंत्र्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत होतील अशी शक्यता आहे. सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे म्हणजे एसटी भाडेवाढीच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष आहे. महामंडळाने १५ टक्के भाडेवाढचा प्रस्ताव मांडला आहे. आज मंत्रिमंडळ याला मान्यता देते का याची उत्सुकता आहे.