भारत देशासाठी विविध क्रीडा प्रकारात २०२४ या वर्षात विशेष आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. नुकतीच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २०२४ ची घोषणा करण्यात आली आहे. 17 जानेवारीला होणार खेलरत्न पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनमध्ये होणार आहे.
चेस वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश, महिला नेमबाज मनु भाकर, हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरालिम्पिक प्रवीण कुमार या चौघांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला नेमबाजपटू मनु भाकर हिने एकाच स्पर्धेत दोन पदकं मिळवून इतिहास घडवला होता. तर हॉकी टीम इंडियाने कॅप्टन हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात ऑलिम्पिकमध्ये सलग दुसर्यांदा मेडल मिळवलं होतं. यासोबत चेसमध्ये विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता होण्याचा बहुमान डी गुकेश याने मिळवला होता. डी गुकेश, महिला नेमबाज मनु भाकर, हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरालिम्पिक प्रवीण कुमार या चौघांसह एकूण ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारने गौरवण्यात येणार आहे.
पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वाखाली भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते आणि त्याच्या नावाची मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. त्याच्यासह या पुरस्कारासाठी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडी T64 गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रवीण कुमार याचेही नाव पाठवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही रामासुब्रमणियम यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय निवड समितीने ही दोन नावं सुचवली होती.
स्वप्नील कुसळेचाही सन्मान
महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कारची घोषणा झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने नेमबाजीत कांस्यपदक जिंकले होते. स्वप्नीलच्या गुरु दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंना १५ लाख रुपये मिळतात. यावर्षीची पुरस्कार जाहीर झालेल्यांची यादी पाहता त्यात क्रिकेटपट्टूंचा समावेश नसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
यापूर्वी खेलरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंना फक्त ७.५ लाख रुपये मिळत होते, परंतु २०२० मध्ये ते २५ लाख रुपये करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.