कोरोना व्हायरसनंतर चीनमध्ये आता पुन्हा एकदा दहशत माजली आहे. यावेळी एचएमपीव्ही या नवीन विषाणूने चीनमध्ये प्रवेश केला आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा आहेत. चीनमध्ये प्रत्येक चेहऱ्यावर मास्क परत आले आहेत. आता चीन पुन्हा जगाला नवीन महामारी देणार आहे का, असा भीती युक्त प्रश्न उपस्थित झाला आहे.मात्र याबाबत जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि चीन सरकारकडून याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
चीनमधील या नव्या व्हायरसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, HMPV हा नवा व्हायरस चीनमध्ये वेगाने पसरताना दिसत आहे.देशातील रुग्णालयात स्मशानभूमीप्रमाणे मृतदेह दिसत असल्याचा दावाही केला जात आहे. अनेक लोकांना या व्हायरसची लागण होत असून चीनमधील रुग्णालयात होत असलेल्या गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. HMPV, कोरोना आणि माइकोप्लाज्मा न्यूमोनिया यासारखे आजार देखील वेगाने पसरत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चीनमधील यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.
HMPV व्हायरसची वैशिष्ठये काय आहेत?
या नवीन विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) आहे, जो आरएनए विषाणू आहे.जेव्हा ह्या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोविड-19 सारखी लक्षणे दिसतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो. हा व्हायरस प्रामुख्याने खोकला आणि शिंक आल्यानंतर वेगाने पसरतो. कोरोनानंतर अनेक लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे.त्यामुळे ह्या आजाराला लोक लवकर बळी पडत आहेत. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील हा वेगाने पेस्ट. या HMPV चे मुख्य सॉफ्ट टार्गेट मुले आणि वृद्ध असल्याचे सांगितले जात आहेत.