जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात शनिवारी रस्त्यावरून लष्कराचे वाहन घसरून खड्ड्यात पडले, या अपघातात चार जवान शहीद झाले, तर दोन जण जखमी झाले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील एसके पायिन भागात हा अपघात झाला. यावेळी लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरले आणि जवळच्या खड्ड्यात पडले. अपघातानंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एमएस बांदीपोरा रुग्णालयाचे डॉ. मसरत यांनी सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या लष्कराच्या सहापैकी पाच जवानांना रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यापैकी दोघांना मृत घोषित करण्यात आले, तर तीन गंभीर जखमींना श्रीनगरला पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वाटेतच एका जवानाचा मृत्यू झाला.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील रुग्णालयात नेत असताना आणखी एका जवानाचा मृत्यू झाला असून, या अपघातात शहीद झालेल्या जवानांची संख्या चार झाली आहे.