गेली काही वर्षे सोशल मीडियाचा वापर अल्पवयीन मुलांमध्येही वाढल्यामुळे त्याचे दुष्पपरिणाम दिसून येत आहे. लहान मुले पालकांच्या नकळत सोशल मीडिया वापरत असल्यामुळे यातून अनेक गुन्हे घडल्याचे समोर आलेले आहे.मात्र यावर प्रतिबंध घालण्याची तयारी आता केंद्र सरकारने सुरू केली आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट, २०२३ मध्ये ही तरतूद करण्यात आली आहे.
सरकारने लहान मुलांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने वैयक्तिक डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट (DPDP) नियमांसाठी मसुदा नियम जारी केला आहे. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट (DPDP) अंतर्गत प्रस्तावित नवीन मसुदा नियमांनुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियावर अकाऊंट तयार करण्यासाठी पालकांची संमती घेणे बंधनकारक असेल.
केंद्र सरकार याबाबत कायदा आणण्याच्या तयारीत असून यावर लोकांना 18 फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि आक्षेप नोंदवता येणार आहेत.18 फेब्रुवारीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच लोकांच्या सूचनांचा आणि मतांचा विचार केला जाईल. नियम मान्य न करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.