अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी शनिवारी वादग्रस्त अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यासह 18 जणांना सर्वोच्च अमेरिकन नागरी सन्मान दिला आहे. राजकारण, क्रीडा, मनोरंजन, नागरी हक्क, LGBTQ अधिकार आणि विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हा सन्मान देण्यात आला आहे. मात्र यावेळी प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराच्या यादीत जॉर्ज सोरोस यांचे नाव असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.जॉर्ज सोरोस हे अमेरिकन अब्जाधीश आणि डावे विचारवंत आहेत. भारत सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधकांसोबत कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
जॉर्ज सोरोस यांच्या जागी त्यांचा मुलगा ॲलेक्स सोरोस हा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित होता. टेस्लाचे मालक एलन मस्क यांनीही सोरोस यांना फ्रीडम मेडल मिळाल्याबद्दल निषेध व्यक्त करत या पदक देण्याच्या निर्णयाला हास्यास्पद म्हटले आहे. अमेरिकेतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून या पदकाकडे पाहण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार १९ लोकांना घोषित झाला आहे. सोरोस हे ओपन सोसायटी फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. लोकशाही मजबूत करणे, मानवी हक्क, शिक्षण, सामाजिक न्याय यासाठी ते काम करत असल्याचा दावा करतात.
पण मस्क यांनी सोरोस यांचा केलेला विरोध नवा नाही. २०२३ मध्ये मस्क यांनी सोरोस यांच्यावर सातत्याने टीका केली होती. सोरोस यांना मानवतेचा तिटकारा असून ते समाजाची वीण उसवण्याचे काम करत आहेत असा आरोप मस्क यांनी केला होता.
A travesty that Biden is giving Soros the Medal of Freedom https://t.co/LGvGe8kqKE
— Elon Musk (@elonmusk) January 4, 2025
तसेच सोरोस यांनी भारतातील मोदी सरकार उलथविण्यासाठी आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. दुसऱ्या देशातील आर्थिक घडी विस्कटणे, अरब स्प्रिंगसारख्या मोहिमांना आर्थिक पाठबळ देणे, तसेच भारतात अदानी यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपांच्या मागेही सोरोसच होते.
सोरोसचे मुख्य विरोधक स्टीव्ह बॅनन यांनी यांनीही सोरोस यांना हा पुरस्कार देण्यावरून टीका केली आहे. “सध्याच्या प्रशासनातील सर्व चुकीचे प्रतिक दाखविणाऱ्या माणसासाठी सन्मानाचा बिल्ला” असे म्हटले आहे. तर जीओपीच्या नेत्या निक्की हेली यांनी या पुरस्काराचा उल्लेख “अमेरिकेच्या तोंडावर आणखी एक थप्पड” म्हणून करत जो बायडेन प्रशासनाच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.