तिबेटमधील शिगात्से येथे आज सकाळी झालेल्या ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. बचावकार्यात आतापर्यंत 130 लोकांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.ढिगाऱ्याखालील लोकांना बाहेर काढण्याचे काम अद्याप चालू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार दुपारी 2 वाजेपर्यंत मृतांची संख्या 95 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 135 लोकांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. टीव्ही चॅनेलवर दाखविल्या जाणाऱ्या चित्रांवरून तिबेटमधील शिगात्से भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. भूकंपात आतापर्यंत ५००० हून अधिक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती या वाहिनीने दिली आहे.
तसेच चीनच्या सीमेला लागून असलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे अर्धा डझन घरे आणि एका पोलिस चौकीच्या इमारतीचे नुकसान झाले आहे.
कोशी प्रदेशचे डीआयजी केशव अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आलेल्या भूकंपामुळे चीनच्या सीमेला लागून असलेल्या सोलुखुंबू, संखुवासभा, ओखलढुंगा आणि तपलेजुंग जिल्ह्यातील काही घरांचे नुकसान झाले आहे. ओखलढुंगा येथील एक घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, तर इतर जिल्ह्यातील 6 घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. भूकंपामुळे डोभाण परिसरातील पोलीस कार्यालयाचेही किरकोळ नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय अन्य कुठूनही नुकसानीचे वृत्त नाही. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी गृह मंत्रालयाने सुमारे दोन हजार पोलिस तैनात केले आहेत.
गृह मंत्रालयाचे प्रवक्ते दिल कुमार लिंबू यांनी सांगितले की, नेपाळ-चीनला जोडलेल्या देशाच्या पूर्व सीमेवरील जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांची तुकडी पाठवण्यात आली आहे. दुर्गम आणि अवघड जिल्हे असल्याने या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दल पोचण्यास वेळ लागत आहे.