गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तसेच तेथील मंदिरांवरही हल्ले होत आहेत. यात आता एका ताज्या घटनेची भर पडली आहे. हल्लेखोरांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या एका हिंदु तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. झालकाठी जिल्ह्यातील रामपूर गावातील बौकाठी बाजारात ही घटना घडली. सुधीब हलदर असे मृताचे नाव आहे.
तसेच फरीदपूरमधील एका हिंदू पत्रकाराच्या कुटुंबाला अज्ञात हल्लेखोराने लक्ष्य केल्याची घटनाही समोर आली आहे. या हल्ल्यात धारधार शस्त्रांचा वापर करण्यात आला असून काही महिलासुद्धा यात जखमी झाल्याची माहिती आहे.
या निर्घृण हत्येचा तीव्र शब्दात निषेध करत कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी हा अत्याचार कधी थांबणार, असा खडा सवाल संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाकडे केला आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी लिहिले, “आपण २१व्या शतकात वा पाषाण युगात जगत आहोत? हे सगळं कधी थांबणार?”ही एक हृदयद्रावक घटना आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी जागतिक समुदायाने सक्रिय व्हायला हवे, असे ते म्हणाले आहेत.
So heart-wrenching! Are we living in 21st Century or stone age? When will this stop @UNHumanRights ? https://t.co/LVHnWMMiXv
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) January 7, 2025
बांगलादेशातही मंदिरांवर हल्ले होत आहेत. मैमनसिंग आणि दिनाजपूर येथील तीन मंदिरांतील एकूण आठ मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे.बांगलादेशला पूर्णपणे मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी जमातसारख्या कट्टरवादी संघटना हिंदूंच्या विरोधात कट रचत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.याहून गंभीर बाब म्हणजे या कट्टरपंथीयांना युनूस सरकारचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे कायदा मोडूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.