पंजाबच्या लुधियाना पश्चिम मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे (आप) आमदार गुरप्रीत गोगी बस्सी यांचा शुक्रवारी रात्री उशिरा संशयास्पद परिस्थितीत गोळी लागून मृत्यू झाला. गुरप्रीत गोगी यांच्या डोक्यात गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे. गोळी कशी झाडली गेली आणि कोणी झाडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गोळीबाराचा आवाज ऐकू येताच त्यांचे कुटुंबीय आणि सुरक्षेसाठी तैनात असलेले कर्मचारी खोलीत पोहोचले आणि त्याला डीएमसी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. माहिती मिळताच घुमरामंडी चौकीच्या पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस स्टेशन डिव्हिजन आठचे पोलिसही घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरा, गोगी यांच्या मृत्यूची बातमी कळताच, अनेक लोक त्यांच्या घरी आणि रुग्णालयात पोहोचले.डीसीपी जसकरण सिंह तेजा म्हणाले की, कुटुंबातील सदस्यांच्या मते, त्यांनी चुकून स्वतःवर गोळी झाडली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल
काँग्रेसमधून राजकीय कारकिर्द सुरू करणारे गुरप्रीत गोगी हे माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते भारत भूषण आशु यांच्या जवळचे होते. मागील सरकारमधील एका माजी मंत्र्याशी असलेल्या बिघडलेल्या संबंधांमुळे, 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडली आणि आम आदमी पक्षात गेले होते.