पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली २०२५ च्या महाकुंभाच्या तयारीने संत आणि ऋषींना प्रभावित केले आहे. मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी त्यांनी काल अमृत स्नानात भाग घेतला आणि सरकारच्या अपवादात्मक व्यवस्थेचे कौतुक केले.
१४४ वर्षांनंतर होणाऱ्या या दुर्मिळ सोहळ्याच्या स्वच्छ, सुरक्षित आणि भव्य महाकुंभाचे कौतुक करून संतांनी या कार्यक्रमाच्या अभूतपूर्व आयोजनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लाखो भाविकांना सामावून घेण्यासाठी केलेल्या अखंड गर्दी व्यवस्थापन आणि नियोजनाचे धार्मिक समुदायाकडून व्यापक कौतुक झाले आणि त्यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सरकारचे मनापासून आभार मानले. जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य म्हणाले की,: “२०२५ च्या या महाकुंभासाठी सरकारने केलेल्या व्यवस्था उल्लेखनीय आहेत. इतक्या मोठ्या गर्दीतही कार्यक्रमाच्या सुव्यवस्थित व्यवस्थापनाबद्दल मी अत्यंत खूश आहे. या प्रयत्नांसाठी सरकार कौतुकास पात्र आहे.”
तर ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमाचे आध्यात्मिक नेते स्वामी चिदानंद सरस्वती यांनी सांगितले की, “हा उत्सव संपूर्ण सनातन धर्मासाठी आहे, अमरत्व आणि शाश्वत सत्याचा हा उत्सव आहे. महाकुंभ विविधतेत एकतेचे प्रतीक आहे. इथे आतापर्यंत लाखो लोक आले आहेत आणि दररोज लाखो लोक येत आहेत. मी सर्वांना हे अनुभवण्यासाठी आमंत्रित करतो.या महाकुंभाच्या निमित्ताने सनातन धर्माचा संगम पवित्र गंगा नदीसारखा कायमचा वाहत राहील. सूर्याचे उत्तरायणात संक्रमण हे आपल्या जीवनाची दिशा बदलण्याची वेळ दर्शवते. जेव्हा दिशा आणि गती बदलते तेव्हा मानसिकता देखील बदलते. राष्ट्राची मानसिकता विकसित होताना, संपूर्ण वातावरण आणि देश बदलेल.
भारतामध्ये, त्याच्या तरुण आणि चैतन्यशील उर्जेसह, एक महान राष्ट्र बनण्याची क्षमता आहे. मोदी-योगी नेतृत्व या परिवर्तनाचा मार्ग मोकळा करत आहे, एक सुसंवादी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करत आहे.”असेही त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.