अमेरिकन अब्जाधीश एलोन मस्क यांच्या अंतराळ कंपनी स्पेसएक्सचे स्टारशिप रॉकेट मिशन अयशस्वी झाले आहे. गुरुवारी उड्डाणानंतर लगेचच समस्या सुरू झाल्याचे स्पेसएक्सने म्हटले आहे. यामुळे मोहिमेचा पुढचा टप्पा पूर्ण होऊ शकला नाही.
या अपयशाबाबत स्पेसएक्सने एक निवेदन जारी केले आहे. एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने गुरूवारी स्टारशीप रॉकेटचे चाचणी उड्डाण केले. मात्र या चाचणी उड्डाणादरम्यान हे स्पेसक्राफ्टचा हवेतच स्फोट झाला आणि ते जमिनीवर कोसळले. कंपनीच्या टेक्सास येथील बोका चिका या प्रक्षेपण केंद्रावरून या रॉकेटचे स्थानिक वेळेनुसार ५ वाजून ३८ मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले होते. हे कंपनीचे या वर्षातील पहिले तर एकूण सातवे चाचणी उड्डाण होते. एलोन मस्कने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि मजेशीर कमेंट करत म्हंटले की यश अनिश्चित आहे, परंतु मनोरंजनाची हमी आहे.
https://twitter.com/elonmusk/status/1880040599761596689
स्टारशिप रॉकेटचे हे सातवे चाचणी उड्डाण होते. स्पेसएक्सच्या मिशन कंट्रोल कम्युनिकेशन्स मॅनेजरने सांगितले की, स्टारशिपशी संपर्क तुटणे हे वरच्या टप्प्यातील तांत्रिक बिघाडामुळे झाले. काही मिनिटांतच अंतराळयान पूर्णपणे नष्ट झाले
रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार अप्पर स्टेजमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने याचा स्फोट झाला. हे जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तीशाली रॉकेटचे चाचणी उड्डाण होचे. नासाने या दशकाच्या अखेरीस अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्यासाठी स्टारशिप्सची एक जोडी राखून ठेवली आहे. तर एलॉन मस्क यांचे ध्येय हे मंगळ ग्रहावर उतरण्याचे आहे.