इस्रायल आणि हमासमधील १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध आता युद्धबंदीनंतर थांबले आहे. रविवारी दोन्ही देशांनी युद्ध तात्पुरते थांबवण्यास सहमती दर्शविली आहे.त्यानंतर पॅलेस्टिनी शहर गाझा येथे बॉम्बहल्ला थांबला आहे. या करारानुसार, हमासने तीन इस्रायली ओलिसांना सोडले आहे, त्या सर्व महिला होत्या. त्याच वेळी, इस्रायलने ९० पॅलेस्टिनी कैदी आणि बंदीवानांनाही सोडले आहे.
इस्रायलने अटक केलेल्या बहुतेक पॅलेस्टिनी कैद्यांमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलांचा समावेश होता, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गुन्हे, दगडफेक आणि हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी या लोकांना ताब्यात घेण्यात आले होते.
जर ही युद्धबंदी अशीच सुरू राहिली तर कैद्यांच्या सुटकेचा पुढचा टप्पा २५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. या काळात हमास ४ महिला ओलिसांना सोडेल. त्या बदल्यात, इस्रायल 30 ते 50 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडेल.
कराराच्या अटी
इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदीचा पहिला टप्पा ४२ दिवसांचा असू शकतो. हमासने एक अट घातली आहे की इस्रायली सैन्य गाझा सीमेपासून ७०० मीटर मागे त्यांच्या हद्दीत जाईल. तसेच पहिल्या टप्प्यात, हमास ३३ ओलिसांना सोडेल ज्याच्या बदल्यात इस्रायल शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांना सोडेल. या काळात, दोन्ही देश कायमस्वरूपी युद्धविरामावरील चर्चा पुढे चालू ठेवतील. या कराराच्या शेवटच्या टप्प्यात गाझाचे पुनर्वसन केले जाणार आहे. यासाठी 3 ते 5 वर्षे लागतील. हमासने मारलेल्या ओलीसांचे मृतदेहही इस्रायलकडे सोपवले जाणार आहेत.