मंगळवारी दुपारी मेघालयातील नैऋत्य खासी हिल्स भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ४.१ होती. मेघालय व्यतिरिक्त, आसाम आणि पश्चिम बंगालच्या काही भागातही ते जाणवले. मात्र यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त सध्या समोर आलेले नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १० किलोमीटर खाली होते. भारतीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र मेघालयातील नैऋत्य खासी हिल्स जिल्ह्यात २५.३४ उत्तर अक्षांश आणि ९१.१७ पूर्व रेखांशावर होते.
मेघालय व्यतिरिक्त, आसाम आणि पश्चिम बंगालच्या काही भागातही ते जाणवले आहे. त्यामुळे लोकांमध्ये क्षणिक भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि ते घराबाहेर पडले आहेत. भूकंपामुळे अद्याप कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तथापि, संभाव्य भूकंपानंतरच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.