भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यास सक्षम असलेले १४४ नौदल कर्मचारी यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कर्तव्य पथावर खांद्याला खांदा लावून पथसंचलन करताना दिसणार आहेत. नौदलाच्या या मार्चिंग तुकडीला दोन महिन्यांहून अधिक काळ विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. नौदलाच्या या चित्ररथात नुकतेच भारतीय नौदलात समाविष्ट झालेल्या स्वदेशी आघाडीच्या युद्धनौका आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी आणि पाणबुडी आयएनएस वागशिर यांचीही झलक बघायला मिळणार आहे. याशिवाय, नेव्ही बँड हृदयस्पर्शी पण त्याचबरोबर पायांना थिरकावेसे वाटेल अशी गाणी सादर करणार आहे.
मार्चिंग कंटीज्ट कमांडर लेफ्टनंट कमांडर साहिल अहलुवालिया म्हणाले की, यावेळी सहभागी नौदल पथकात १४४ तरुण कर्मचारी असतील, जे कर्तव्य पथावर पथसंचलन करताना दिसणार आहेत. तसेच सैन्यातील सदस्यांचे सरासरी वय २५ वर्षे आहे. या कर्मचाऱ्यांची भारतीय नौदलाच्या सर्व शाखांमधून निवड करण्यात आली आहे आणि त्यांना दोन महिन्यांहून अधिक काळ विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या तुकडीचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर इंद्रेश चौधरी, लेफ्टनंट कमांडर काजल भारवी आणि लेफ्टनंट दिविंदर कुमार प्लाटून कमांडर म्हणून करतील.
ते म्हणाले की नौदलाचे मार्चिंग पथक देखील एका भारताच्या सूक्ष्म रूपाचे प्रतिनिधित्व करते, ज्यामध्ये १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अधिकारी आणि खलाशी यांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, विविधता, लष्करी पराक्रम आणि तांत्रिक प्रगतीचे दर्शन घडते. ‘लढाईसाठी सज्ज, विश्वासार्ह, एकसंध आणि भविष्यासाठी सज्ज दल’ असण्याच्या भारतीय नौदलाच्या दृष्टिकोनाला अनुसरून, परेड आणि बीटिंग रिट्रीटमध्ये सहभागी होणारे सर्व कर्मचारी स्वावलंबीतेद्वारे सागरी सुरक्षेसाठी भारतीय नौदलाची वचनबद्धता प्रदर्शित करतील.
नौदलाचा चित्ररथ
अभिमानाने भरलेला आणि राष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या भारतीय नौदलाचा चित्ररथ ‘मजबूत राष्ट्रासाठी’ मजबूत नौदलाची गरज असल्याचे स्पष्ट उदाहरण असेल. भारतीय नौदल आपल्या बहुआयामी संपत्तीसह कधीही, कुठेही भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी आणि भारताच्या विकास, वैभव आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करण्यासाठी दृढ वचनबद्ध आहे. हे यातून बघायला मिळेल. या चित्रफितीत स्वदेशी आघाडीची जहाजे आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी आणि पाणबुडी आयएनएस वागशीर दाखवण्यात येतील, ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ जानेवारी रोजी मुंबईत नौदलात समाविष्ट केले होते. चित्ररथाचे नेतृत्व कमांडर लेफ्टनंट कमांडर ममता सिहाग आणि लेफ्टनंट विपुल सिंग गेहलोत करतील.
नेव्ही बँड
भारतीय नौदलाच्या बँडचे नेतृत्व एम. अँटनी राज, एमसीपीओ संगीतकार प्रथम श्रेणी करतील आणि त्यात ८० संगीतकारांचा समावेश असेल. ते सर्वजण अभिमानाने आणि सन्मानाने परेडमध्ये हृदयस्पर्शी आणि पाय थिरकवणारी गाणी सादर करतील. २९ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारोप समारंभाचे प्रतीक असलेल्या बीटिंग रिट्रीट दरम्यान विजय चौकात अनेक नवीन रचना सादर करून नौदल बँड प्रभावी सादरीकरण करेल. पहिल्यांदाच सहा महिला या बँडमध्ये सामील होताना दिसणार आहेत.