90 च्या दशकातील बॉलिवूडची स्टार अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने बॉलीवूड सारखं ग्लॅमरस क्षेत्र सोडत आता अध्यत्माचा खडतर मार्ग स्वीकारला आहे. प्रयागराज इथं तब्बल १४४ वर्षांनंतर होणाऱ्या महाकुंभमेळ्यात ऐतिहासिक भव्य दिव्य आणि प्रचंड पवित्र अशा महाकुंभमेळ्याच्या सोहळ्यात किन्नर आखाड्याकडून दीक्षा घेत स्वतःच पिंड दान करत आता माई ममता नंद गिरी हे नवीन नामाभिधान स्वीकारलं आहे.
खरं तर ममता कुलकर्णी 25 वर्षांपासून भारताबाहेर आहे. बराच काळ भारताबाहेर राहिल्यानंतर अभिनेत्री डिसेंबर 2024 मध्ये भारतात परत आली होती. यादरम्यान, एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले देखील होते की, ती महाकुभ 2025 मध्ये सामील होण्यासाठी आली आहे.
दरम्यान, ममता कुलकर्णीच्या या निर्णयाने सर्वचजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. अशातच आता ममता कुलकर्णी हिने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना तिने सांगितलं की, ‘तिने 23 वर्षांपूर्वी कुपोली आश्रमातील जुना आखाडाच्या चैतन्य गगन गिरी महाराज येथून दीक्षा घेतली आणि दोन वर्षांपासून लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला आहे.’
अभिनेत्रीने पुढे सांगितले की, ‘लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी माझी २३ वर्षांची तपश्चर्या समजून घेतली आणि स्वामी महेंद्रानंद गिरी महाराज यांनी माझी परीक्षा घेतली ज्यामध्ये मी उत्तीर्ण झाले. गेल्या तीन दिवसांपासून माझी परीक्षा घेतली जात आहे हे मला माहीत नव्हते. कालच मला महामंडलेश्वर बनवण्याचं आमंत्रण आलं. पुढे अभिनेत्रीने किन्नर आखाड्यात सामील होण्याचे कारण सांगितले, ‘किन्नर आखाडा मध्यम मार्गी आहे म्हणून मी यात सामील झाले. असं अभिनेत्रीने म्हंटल आहे.
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मला बॉलीवूडमध्ये परत जायचे नव्हते, म्हणून मी 23 वर्षांपूर्वी बॉलिवूड सोडले. आता मी मध्यममार्गाचा अवलंब करून स्वतंत्रपणे सनातन धर्माचा प्रचार करेन.’
चित्रपट प्रवासाविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मी 40-50 चित्रपटांमध्ये काम केले आणि जेव्हा मी चित्रपटसृष्टी सोडली तेव्हा माझ्या हातात 25 चित्रपट होते. मी कोणत्याही संकटामुळे संन्यास घेतला नाही, तर आनंद अनुभवण्यासाठी मी संन्यास घेतला.” असं ती म्हंटली आहे.